मुलांकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेऊ द्यावे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी चिखली येथे बोलताना व्यक्त केले. म्हेत्रे वस्ती येथील गजानन म्हेत्रे प्रतिष्ठानच्या वतीने तीनशे विद्यार्थ्यांना आमदार लांडगे यांच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी नगरसेवक शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, दत्ता साने, अरूणा भालेकर, अमृत सोनवणे, प्रवीण भालेकर, संजय नेवाळे आदी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य तसेच महापालिका मान्यताप्राप्त ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना लांडगे म्हणाले, की पालकांनी आपल्या मुलांकडून जादा अपेक्षा ठेवू नयेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेऊ द्यावे.

आपल्याकडे जे कौशल्य आहे, त्याचा विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी देखील उच्चशिक्षण घेऊन परिसराचे नाव उज्ज्वल करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक म्हेत्रे यांनी केले. अरूणा भालेकर यांनी आभार मानले.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
students draw class teacher sketch funny video
निरागस चिमुकल्यांनी काढले शिक्षिकेचे चित्र, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल