07 March 2021

News Flash

बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या

संजय दत्तात्रय विभुते (वय १८, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी थेरगाव परिसरात घडली.

संजय दत्तात्रय विभुते (वय १८, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. संजय याने बारावीची परीक्षा दिली होती. बुधवारी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्याने ऑनलाइन निकाल पाहिला. अनुत्तीर्ण झाल्याने तो निराश झाला होता. घरी आल्यानंतर तो खोलीत गेला. दरवाजा बंद करून त्याने छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा बाहेरून वाजविला. मात्र, संजय याने प्रतिसाद न दिल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 12:43 am

Web Title: students commit suicide due to failed in hsc exam in pune
टॅग : Hsc Exam
Next Stories
1 रेल्वेच्या अनारक्षित डब्यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश!
2 Hsc result 2016 : बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी; निकालाची टक्केवारी घसरली
3 शुल्क भरण्यास विलंब केला, तरी पालकांकडून दंड घेऊ नये
Just Now!
X