पुणे : महापालिके च्या कार्यक्षेत्रातील तब्बल दहा हजार रुग्ण घरगुती विलगीकरणात उपचार घेत आहेत. मात्र, वैद्यकीय चाचणीनंतर करोनाचा संसर्ग असल्याचे निदान झाले असता आरोग्य यंत्रणांकडे नोंदणी के ल्याशिवाय रुग्णाने गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारू नये असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्य़ातील तब्बल १७,०४४ करोनाचे रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यांपैकी १०,७०२ रुग्ण पुणे शहरातील तर ३०१३ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत. उर्वरित ३३२९ रुग्ण हे उर्वरित पुणे जिल्ह्य़ातील आहेत. सहसा कमी किं वा सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या, तसेच घरात स्वतंत्र खोली आणि स्वच्छतागृह असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरण करण्यास परवानगी दिली जाते. मात्र, गृह विलगीकरणातील रुग्णाची प्रकृ ती खालावली असता त्याला रुग्णालयात खाट मिळण्यास अडचण येऊ नये, यासाठी रुग्णाने स्थानिक आरोग्य यंत्रणांकडे नावनोंदणी के ल्यानंतरच गृहविलगीकरण करावे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

गृहविलगीकरण स्वीकारलेल्या रुग्णांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी दिवसातून काही तासांच्या अंतराने पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरच्या सहाय्याने शरीराचे तापमान तसेच रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासणे, त्याबाबतची माहिती डॉक्टरांना कळवणे बंधनकारक आहे. रुग्णाच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी एक निरोगी व्यक्ती घरी असणे महत्त्वाचे आहे,

जेणेकरून रुग्णाच्या प्रकृतीतील चढउतारांची माहिती डॉक्टरांना कळवणे शक्य होईल. रुग्णाच्या वापरातील वस्तू तसेच खोली, स्वच्छतागृहाचे र्निजतुकीकरण करण्याच्या सूचनाही गृह विलगीकरणातील रुग्णांना देण्यात आल्या असून, तशी हमी घेऊनच गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येत आहे.