News Flash

सहा जणांना जखमी करणाऱ्या मोटार चालकास पोलीस कोठडी

मद्यपान करून भरधाव मोटार चालवित सहा जणांना जखमी केलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने शुक्रवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

| November 22, 2013 02:43 am

मद्यपान करून भरधाव मोटार चालवित सहा जणांना जखमी केलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने शुक्रवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी संध्याकाळी डेक्कन जिमखाना येथे संध्याकाळी ही घटना घडली होती.
महेश मारुती सरदेसाई (वय ३८, रा. साई व्हिला, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरदेसाई याने भरधाव मोटार चालवित डेक्कन जिमखाना बसस्थानकाजवळ चार दुचाकी, एक रिक्षा, पाणीपुरी गाडी यांना उडविले होते. यामध्ये रिक्षातील दोघे, दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणी आणि पाणीपुरीवाला, तीन दुचाकीवरील असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तरुणीची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर पळून जाताना नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी सरदेसाई याला पकडले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 2:43 am

Web Title: that drunk motordriver gets police custody
टॅग : Police Custody
Next Stories
1 सुरतवाला व पी. टी. पवार ‘पुण्यरत्न’ पुरस्काराचे मानकरी
2 शाळांनी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये केलेले प्रवेश अनधिकृत
3 बेकायदेशीर लोहमार्ग ओलांडणाऱ्या वाहनांची माहिती देण्याचे आवाहन
Just Now!
X