पुण्यातलं सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्यात आलं आहे. करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे महापालिकेनं हे सर्वात मोठं कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हे कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरची मर्यादा साडेतीन हजार आहे. पुणे महापालिका आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने हे कोविड सेंटर चालवलं जात होतं. मागील काही दिवसांपासून शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सध्या पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये देखील ८०० बेड पैकी ६०० हून अधिक बेड रिकामे आहेत. करोनाची रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्यात उभारण्यात आलेलं जम्बो कोविड केअर सेंटर मधील ही सहाशेहून अधिक बेड सद्यस्थितीत रिकामे आहेत. त्यामुळे महापालिकेने हे साडेतीन हजार क्षमतेचं कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पुणे शहरात गुरुवारी १६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर २२८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पुणे शहरातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ६२ हजार ६४७ एवढी झाली आहे. आजवर १ लाख ५२ हजार ८४१ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 1:34 pm