राज्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून स्वामिनाथन आयोगाचाच्या शिफारसी मंजूर झाल्या पाहिजेत ही मागणी करत आहेत. तीच आमचीही भूमिका आहे. शेतकऱ्याच्या शेतमालास योग्य भाव मिळाला पाहिजे आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी मंजूर केल्या पाहिजेत असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. पुण्यात नाम फाऊंडेशन तर्फे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी ही भूमिका मांडली.

शेतकऱ्यांना शेतमाल साठवण्यासाठी गोदामं नाहीत. त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर तोटा होतो. सध्याचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. रोबोटच्या माध्यमातून कामे केली जात आहेत. त्यामुळे भविष्यात नोकऱ्यांचे संकट निर्माण होण्याचीही शक्यता आहे. अशात येत्या काळात अनेक लोक शेतीकडे वळतील अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली.

विदर्भ, मराठवाडा सह आता येत्या काळात नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात देखील कामे जाणार आहे.त्यामुळे येथील शेतकयांच्या कामांना देखील चालना मिळण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून एक चळवळ उभी राहिली आहे.त्याचा एक भाग म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यासाठी सामुदायिक विवाहसाठी एक लाख रुपये दिले जाणार असून धर्मादय आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत देणार आहोत. या कार्यक्रमात बीसीसीआय ची देखील मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.