26 March 2019

News Flash

पुण्यात पेपर मिल-फर्निचर गोदामाला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

फर्निचर दुकानात झोपलेल्या मजुरांचा मृत्यू

पुण्यातील शिवाजी नगर परिसरात असलेल्या एका पेपर मिल व फर्निचर गोदामाला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. (छायाचित्र:एएनआय)

पुण्यातील शिवाजी नगर परिसरात असलेल्या एका पेपर मिल व फर्निचर गोदामाला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे सात बंबांचा वापर करण्यात आला. मृत दोघेही फर्निचर दुकानातील सुतारकाम करणारे मजूर असल्याचे सांगण्यात येते. लक्ष्मणराम व नरपतसिंह असे मृत मजुरांची नावे असून ते राजस्थानचे असल्याचे सांगितले जाते.

शिवाजी नगर परिसरातील भोसले जलतरण तलावासमोर एक खासगी पेपर मिल आहे. रात्री तीनच्या सुमारास अचानक येथे आग लागली. या मिलच्या बाजूलाच फर्निचरचे गोदाम आहे. त्यामुळे आग लगेचच पसरली. फर्निचर दुकानाच्या पोटमाळ्यावर लक्ष्मणराम आणि नरपतसिंह झोपले होते. आगीत दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढला असून कुलिंगचे काम सुरू आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, रात्री उशिरा पिंपरी येथेही महावितरणच्या डीपीला आग लागून मोठे नुकसान झाले.

First Published on March 14, 2018 9:02 am

Web Title: two killed in a fire which broke out in punes shivajinagar last night