पिंपरी- चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूमुळे एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू झाला. ४८ वर्षीय महिला आणि ४१ वर्षीय पुरुषाचा यात समावेश आहे. दोघांवर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शहरात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता आठवर पोहोचला आहे.
पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरात सध्या स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. चिखलीतील ४८ वर्षीय महिलेला २७ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर निगडी येथील ४१ वर्षीय पुरुषाला २८ ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या बळींसह स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा नऊवर पोहोचला आहे.
शहरात स्वाईन फ्लूचे ४६ रुग्ण आढळले. यामुळे नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तेरा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक असून जानेवारी ते जून दरम्यान एकच रुग्ण दगावला होता. ऑगस्टमध्ये आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.