28 January 2020

News Flash

माणुसकी गोठली! पुण्यात गारठवणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक

दोघांवरही ससून उपचार सुरू

गारठवून टाकणाऱ्या थंडीत पुण्यातील पाषाण तलावाजवळ जुळी अर्भके आढळून आल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना ही जुळी अर्भक दिसली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

मंगळवारी सकाळी आठ वाजता काही नागरिक नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जात होते. पाषाण तलावाजवळून जात असताना नागरिकांना ब्लँकेटमध्ये दोन जुळी नवजात अर्भक गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आली. ही दोन्ही बालक एक दिवसाची असून थंडी आणि भुकेनं व्याकुळ झाल्यानं रडत होती.

 

परिसरातील नागरिकांनी दोन्ही बाळांना दूध पाजलं. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आले. त्यानंतर दोन्ही बालकांना, रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु असून, दोघांची तब्येत व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच या बालकांना कोणी या ठिकाणी सोडले याबाबतचा तपास पोलीस करीत आहे.

First Published on January 14, 2020 4:48 pm

Web Title: two new born baby found in pune bmh 90
Next Stories
1 पुढील सहा दिवस पुण्याच्या गारठ्यात चढ-उतार
2 पुणे- पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास, मृतदेह पाहून सात वर्षीय चिमुरडीने फोडला टाहो
3 शिवाजी महाराज राहू देत, आजोबांचा विचार तरी अमलात आणा; उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Just Now!
X