News Flash

दिंडीतील दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

पघातानंतर वाहनचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जनाबाई साबळे (५५) आणि सुमनबाई इंगोले (६०) अशी या मृतांची नावे आहेत.

संग्रहित छायाचित्र

मोशी येथे मुक्कामी असलेल्या दिंडीतील दोन वारकरी महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. रस्ता ओलांडत असताना या महिलांना वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जनाबाई साबळे (५५) आणि सुमनबाई इंगोले (६०) अशी या मृतांची असून त्या बीडच्या रहिवासी होत्या.

आळंदीच्या दिंडीत सहभागी झालेल्या जनाबाई साबळे आणि सुमनबाई इंगोले या पंढरपूरला जाणार होत्या. ही मंगळवारी दिंडी मोशी येथे मुक्कामी होती. बुधवारी पहाटे त्या दोघी प्रात:विधीला जात होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 9:28 am

Web Title: two women varkari dies in accident at moshi
Next Stories
1 पुणे-सातारा रोडवरील हॉटेलमध्ये आग, अग्निशमन जवानासह चार जण जखमी
2 यंदाच्या वारीत पर्यावरणाचीही भक्ती!
3 पिंपरी शहरात एकाच दिवशी दोन खून
Just Now!
X