१८ ते ४४ वयोगटातील लशीकरणासाठी पालिका केंद्रांत गर्दी

पुणे : १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा शनिवारचा पहिला दिवस गोंधळ आणि गर्दीचा ठरल्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी त्या तुलनेत लसीकरणाची प्रक्रिया काहीशी सुरळीत झाली. गर्दीमुळे पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेने लसीकरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे रविवारी जास्त संख्येने नागरिकांना लस देण्यात आली.

रविवारी महापालिके च्या कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालयात जवळपास पाचशेहून अधिक नागरिकांचे  लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शनिवारी गोंधळ आणि गर्दीमुळे जेमतेम पाचशे जणांचे लसीकरण होऊ शकले. त्यामुळे रविवारी उपलब्ध लसीतून नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. को-विन संके तस्थळावरून नोंदणी के लेल्या नागरिकांची या दोन्ही केंद्रांत सकाळपासूनच गर्दी झाली होती. रुग्णालयांनी नोंदणी के लेल्या नागरिकांची यादी प्रसिद्ध के ली होती. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया रविवारी सुलभ होऊ शकली.

केंद्रसरकारच्या आदेशानुसार १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शनिवारपासून प्रारंभ झाला. महापालिके चे कमला नेहरू रुग्णालय आणि येरवडय़ातील राजीव गांधी रुग्णालय या दोन केंद्रांत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेकांनी  को-विन पोर्टलवर नोंदणी के ली होती. त्यासाठी जवळचे केंद्रनागरिकांनी निवडले होते. अनेकांची नोंदणी झाली होती. मात्र त्यांना वेळ मिळाली नव्हती.  केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.  यादीमध्ये नाव शोधण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. त्यातून केंद्रांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. यादीत नाव नसल्यामुळे केंद्रातील कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांचे वाद झाले. पुढील आठवडाभर रोज नोंदणी के लेल्या ७०० नागरिकांचे लसीकरण होणार आहे.