News Flash

पुणे: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पतीविरोधात पत्नीनेच दाखल केली तक्रार

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पत्नीनेच दाखल केली तक्रार

पत्नीसोबत शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पतीविरोधात पत्नीनेच पोलिसामध्ये तक्रार दाखल केल्याचा प्रकार चिखलीमध्ये घडला आहे. पती आपल्याला शिवीगाळ, मारहाण करतो तसेच आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३३ वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  चिखली पोलीस गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय फिर्यादी महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. “फेब्रुवारी महिन्यात धुमधडाक्यात विवाह झाला. तक्रारदार महिलेच्या वडिलांनी लग्नावर तब्बल २० लाख रुपये खर्च केले. परंतु, विवाह झाल्यानंतर आरोपी पतीने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. विवाह करताना संबंधित व्यक्तीने मला आणि माझ्या घरच्यांना खोटी माहिती दिली. माझ्या पतीने एकही जबाबदारी पार पडली नाही,” असं या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

“सासरी आल्यानंतर माझ्यासोबत पतीने कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. शिवाय फ्लॅट घेण्यासाठी आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत ते मला सतत शिवीगाळ, मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळ करायचे,” असं या महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

चिखली पोलिसांनी या प्रकरणामध्ये पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 11:36 am

Web Title: wife filed a police complaint against her husband as he refuse to have physical relationship scsg 91
Next Stories
1 गंधर्व सुरांचा दरबार आजपासून पाच दिवस
2 ‘सेवा’ कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थितांची गैरसोय
3 गंधर्व सुरांचा दरबार आजपासून पाच दिवस
Just Now!
X