पुणे शहरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून आज दिवसभरात ११७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजची रुग्ण संख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब बनली आहे.
पुणे शहरात करोना विषाणूंचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना, देखील आज दिवसभरात ११७ रुग्ण आढळले. त्यामुळे पुणे शहरातील रुग्ण संख्या २१४६वर पोहोचली असून या दरम्यान ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज अखेर मृतांची संख्या १२५ वर पोहोचली आहे. तसेच १४ दिवसानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या ८४ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. आजअखेर ६७१ जणांना घरी सोडण्यात आलं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील ७० हजार घरात पालिका रेशन वाटप करणार
पुणे शहरातील मध्य भागात करोना विषाणूंचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून तो भाग सील करण्यात आला आहे. यामुळे तेथील नागरिकांना बाहेर पडता येत नाही. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित भागातील तब्बल ७० हजार घरामध्ये उद्यापासून रेशनिंगचे वाटप केले जाणार आहे. प्रशासनामार्फत याबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 7, 2020 9:42 pm