पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ११०१ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ८४ हजार ४९६ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ०३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या ११८८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६७ हजार ७७७ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९०० करोनाबाधित रुग्ण आढळले असून २६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ६१८ जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ५१७ वर पोहचली असून यांपैकी, २८ हजार ५७५ जण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार ७२३ एवढी झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.