News Flash

मित्राच्या Whats App वर पोस्ट टाकून पत्नी पीडित तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

या प्रकरणी चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

 

पत्नी आणि सासू सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. कुणाल (नाव बदललेले आहे) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पतीचे नाव आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या मित्राच्या पर्सनल Whats App आणि ग्रुपवर व्यथा मांडली आहे. सासरच्या व्यक्तीकडून होणारा जाचामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने आपल्या पोस्मटध्ये नमूद केले. तो गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. दरम्यान, हे प्रकरण चिखली पोलीस ठाण्यात गेलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाने शुक्रवारी साडेनऊ च्या सुमारास आपल्या Whats App ग्रुपवर आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली. यामुळे मित्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सर्व मित्रांनी असं टोकाचं पाऊल उचलू नकोस अस सांगितलं. अनेक मित्रांनी त्याला फोन केले, मात्र तो पर्यँत या तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ‘मला न्याय हवा आहे असे तो ओरडून सांगत आहे. दरम्यान, त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी Whats App ग्रुपवरवरील मित्रांनी आवाहन केलं आणि पैसे जमा करून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.

पीडित तरुणाच्या पत्नीला वेगळं राहायचं आहे, ती माहेरी गेल्यानंतर सासरी लवकर येत नाही. पती आणि पत्नीचे अंतर्गत वाद आहेत. यातून त्याने हे कृत्य केलं आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. पत्नीला समजावून सांगा अस ही तो म्हणत आहे. पत्नीच्या जाचाला तो कंटाळला आहे. औषध घेतल्यानंतर पत्नी त्याला सोडून माहेरी गेली आहे.

काय  होती पोस्ट?

मी आत्महत्या करत आहे, सासरच्या व्यक्तींनी खूप त्रास दिला आहे. सारखं आई वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी टॉर्चर करत आहेत. पत्नी तिच्या बहिणीच्या लग्नासाठी ५० हजारांची मागणी करत आहे. पैसे दिले नाही तर केस करेल अशी धमकी पत्नी देत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 9:04 pm

Web Title: youth tried suicide because of wifes torture in pimpri he posted post on friends whats app scj 81
Next Stories
1 पिंपरी महानगरपालिकेच्या दारात जखमी वासरु सोडून बजरंग दलाचे आंदोलन
2 पुणे विद्यापीठात दोन नवी वसतिगृहे बांधली जाणार
3 मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Just Now!
X