पुणे : पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३३६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मिळून १ लाख १० हजार ७३ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे नामांकित आणि मनासारख्या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चुरस होणार आहे. राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यावर केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यात विद्यार्थी नोंदणी, महाविद्यालय नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. महाविद्यालयाच्या नोंदणीसाठी ३१ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती, या मुदतीत महाविद्यालयांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यात केंद्रीय पद्धतीने प्रवेशासाठी (कॅप) ८३ हजार ५८३, तर राखीव कोट्यातील प्रवेशासाठी २६ हजार ४९० जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.  कोटाअंतर्गत जागांवरील प्रवेशही संबंधित महाविद्यालयांना गुणवत्तेनुसारच द्यावे लागणार आहेत.

हेही वाचा >>> पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीचा प्रताप; पिकअप चालवताना दुचाकीला उडवले, तरुणाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्तापर्यंत अकरावी प्रवेशासाठी ५९ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ३९ हजार ५००पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरुन तो अंतिम केला आहे. १८ हजार २९९ अर्जांची ऑनलाइन, तर १६ हजार ८९२ अर्जांची मार्गदर्शन केंद्राद्वारे पडताळणी करण्यात आली आहे. यंदा दहावीचा निकाल वाढल्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रता गुणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नामांकित आणि मनपसंत महाविद्यालयात. प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची चुरस होणार आहे. पसंतीक्रम, भाग दोन भरण्याची  सुविधा बुधवारपासून विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरल्यानंतर महाविद्यालयांचे पसंतीक्रम, प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. त्यासाठीची सुविधा  येत्या बुधवारपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे.