पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १ हजार ६ रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची एकूण संख्या २५ हजार १७४ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ७८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ५८१  रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १५ हजार ५७९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरीत ५८७ नवे रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात आज ५८७ जण करोना बाधित आढळले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पैकी, ९ हे शहरातील असून २ जण ग्रामीण भागातील आहेत. आज १७२ जण करोनामुक्त झाले आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत ३ हजार ६८१  जण हे करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची संख्या सहा हजारांच्याही पुढे गेली आहे.  बाधित रुग्णांची एकून संख्या ६ हजार ६१ वर पोहचली असून शहरातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1006 new corona cases in pune and 587 new cases in pimpri scj 81 svk 88 kjp
First published on: 09-07-2020 at 22:32 IST