लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागातील महमदवाडी परिसरात घडली. दोन दिवसांवर पूर्वपरीक्षा येऊन ठेपली असताना विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शोककळा पसरली.

रेहा प्रशांत वर्गीस असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. रेहा दहावीत होती. दोन दिवसानंतर पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. शुक्रवारी सायंकाळी घरात कोणी नव्हते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेहाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

आणखी वाचा-मतदान करा अन् बिलात सवलत मिळवा! पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी पालकांकडे चौकशी केली. दोन दिवसानंतर दहावीची पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. अभ्यासाच्या ताणामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.