पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये चिखली परिसरात भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याने दीडशे गोडाऊन जळून खाक झाले आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तवला आहे. चिखली परिसरात हजारो भंगार गोडाऊन आहेत. तिथे दरवर्षी आगीच्या घटना घडतात. आश्चर्यकारक बाबा म्हणजे आगीमध्ये जळून खाक झालेली दीडशे गोडाऊन हे अनधिकृत आहेत. अशी कबुली स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी मनोज लोणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. अठरा तास उलटून ही आग धुमसत असून कुलिंग चे काम सुरू आहे.

शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास चिखलीतील गोडाऊनला भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करत शेजारीच असलेल्या इतर गोडाऊनला देखील आग लागल्याने तब्बल दीडशेपेक्षा अधिक गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए त्याचबरोबर खासगी कंपन्यांकडून आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे. सध्या त्या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू असून आग धुमसत असल्याने आणखी काही तास लागल्याची शक्यता आहे. चिखलीत अगदी छोट्या गल्ल्यांमधून या दुकानांकडे जावं लागतं. त्यामुळे अग्निशमन वाहनांना त्या ठिकाणी जाण्यासाठी कसरत करावी लागली.

Pune Porsche Accident Registration of a car worth crores is incomplete for just Rs 1758 pune news
Pune Porsche Accident : कोट्यवधी किमतीच्या मोटारीची नोंदणी फक्त १७५८ रुपयांमुळे अपूर्ण
girl from andheri robbed by throwing inflammable
कल्याणमध्ये अंधेरीतील तरूणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून लुटले
Metro security guards caught the bicycle thief in Nagpur
नागपूर: मेट्रो सुरक्षारक्षकांनी सराईत सायकल चोराला पकडले
man inhuman torture to his wife in Pimpri-Chinchwad is arrested by police
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीवर पतीचे अत्याचार, राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
leopard in Nagpur city fear among citizens
सावधान ! उपराजधानीत वाढला बिबट्याचा वावर
nagpur illegal hoardings marathi news
नागपूरमध्ये रेल्वेच्या जागेतील सर्वच जाहिरात फलक अवैध
Advertisement board at Telephone Exchange Square destroyed
नागपूर: टेलिफोन एक्सचेंज चौकातील जाहिरात फलक खिळखिळा, कधीही अंगावर…
akola, 7 year old girl electrocuted
दुर्दैवी! चालू कुलरला स्पर्श झाला अन् होत्याचे नव्हते झाले; विजेचा धक्का लागल्याने…

आणखी वाचा-‘वंचित’कडून मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

चिखली परिसरात बहुतांश भंगार गोडाऊनची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. मात्र, यावर पिंपरी- चिंचवड महानगरपालिका कारवाई करताना दिसत नाही. आज घडलेल्या घटनेमध्ये अद्याप किती नुकसान झालं याबाबत माहिती समोर येऊ शकली नाही. अशी माहिती महानगरपालिकेचे अधिकारी मनोज लोणकर यांनी दिली आहे. अनधिकृत भंगार गोडाऊनवर कारवाई करताना उदासीनता का दिसते? की आर्थिक गणिते आडवी येतात? असा प्रश्न निर्माण होतो आहे. नशीब बलवत्तर असल्याने आजच्या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा जीविहितहानी झालेली नाही.