वाकड येथील सूर्या  रूग्णालयामधील सर्व ५० रूग्ण आणि १२० कर्मचाऱ्यांची अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, एनडीआरएफच्या पथकांनी सुटका करून सुरक्षित जागी हलविले आहे. या रूग्णालयात मुळा नदीचे पाणी शिरले होते.

मुसळधार पावसामुळे व मुळा नदीला पुर आल्याने वाकड येथील सूर्या हॉस्पिटलला पाण्याने पुर्णतः वेढले होते. त्यामुळे रूग्णालयामध्ये ५० रूग्ण आणि १२० कर्मचारी अडकले होते. त्यांना बाहेर येता येणे शक्य नव्हते व पाण्याचा प्रवाह देखील कमी होत नव्हता. अखेरीस अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, एनडीआरएफच्या पथकांनी या सर्वांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले.