चाकण औद्योगिक वसाहतीत निघोजे येथील ‘आयएसी इंडिया’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना १९ हजार २६७ रूपयांची वेतनवाढ देण्यात आली आहे.
स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनात वेतनवाढ करार झाला. या वेळी संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे, कामगार आयुक्त सुनील बागल, कामगार उपआयुक्त संभाजी काकडे उपस्थित होते. व्यवस्थापनाच्या वतीने दिपाली खैरनार, पवन मालसे, सिनोज मॅथ्यू, अनिकेत निळेकर, ओंकार बडवे, महेश सावंत यांनी सह्या केल्या.

करारानुसार, कंपनीतील कामगारांना तीन टप्प्यात एकूण १९ हजार २६७ रुपये इतकी पगारवाढ मिळणार आहे. कुटुंबासाठी विमा योजना, मृत्यू सहाय्य योजना, अपघातात अपंगत्व आल्यास मदतनिधी, सुट्ट्या, दिवाळी बोनस, मासिक हजेरी बक्षीस, सेवा बक्षीस, कामगारांच्या मुलांना बक्षीस, वैद्यकीय कर्ज सुविधा, गुणवंत कामगार पुरस्कार आदी सुविधा मिळणार आहेत.

प्रास्ताविक अनिकेत निळेकर यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले. सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.