बीएमसीसी महाविद्यालयातून ‘बीबीए’ (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षांच्या बावीस मुलांना विद्यापीठाच्या परीक्षेत चक्क शून्य गुण मिळाले आहेत.
‘फायनॅन्शिअल सव्र्हिस’ या विषयात या विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती आणि त्यांचे अंतर्गत परीक्षेचे गुण आपण वेळेवर विद्यापीठाला पाठवले असल्याचा दावा महाविद्यालयाने केला आहे. त्यामुळे हा विद्यापीठाकडूनच झालेला आणखी एक घोटाळा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या विद्यार्थ्यांचे खरे गुण सोमवापर्यंत त्यांना कळू शकतील, असे बीसीयूडीचे (बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट) संचालक व्ही. बी. गायकवाड यांनी सांगितले आहे. या वेळी विद्यापीठाने ‘झीरो एरर’ धोरणाचा अवलंब केला असून सर्व परीक्षांचे निकाल ठरलेल्या वेळी लावण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.