लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परराज्यातून विक्रीस पाठविलेला भांगमिश्रीत गोळ्या जप्त करण्यात आल्या. मंचर परिसरातील भोरवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५० किलो भांग मिश्रीत गोळ्यांची पाकिटे आणि मोटार असा नऊ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी प्रवीण मगाराम चौधरी (रा. देहूफाटा, चाकण, जि. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली. मंचर परिसरातील भोरवाडी परिसरात एका मोटारीतून परराज्यातून भांग मिश्रीत गोळ्या विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर पथकाने संशयित वाहन अडवून तपासणी केली. तेव्हा वाहनात महालक्ष्मी आयुर्वेदिक फार्मानिमित्त बावा विजयावटी भांग मिश्रीत गोळ्या एका पाकिटांमध्ये भरुन ठेवल्याचे आढळून आले. पथकाने २५० किलो भांग मिश्रीत गोळ्यांची पाकिटे, तसेच मोटार, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-पिंपरी :स्वयंचलित वाहनांमार्फत रस्त्यावरील खड्ड्यांचे सर्वेक्षण

निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने, धीरज सस्ते, सतीश पौंधे, शशिकांत भाट, रणजीत चव्हाण, अनिल थोरात, अमोल दळवी, राहुल तारळकर यांनी ही कारवाई केली.