सीरम इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने हडपसर तसेच सासवड परिसरातील २८ तरुणांची ४१ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी मंगेश राजाराम पवार (वय ३२, रा. तुकाई दर्शन, फुरसुंगी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिकेत जगन्नाथ जगताप (वय २४, रा. ताथेवाडी, सासवड) याने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीन महिन्यांपूर्वी जगताप याची आरोपीशी ओळख झाली होती. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी लावण्याचे आमिष त्याने दाखविले होते. त्याच्याकडून पवारने ऑनलाइन पद्धतीने दीड लाख रुपये घेतले होते. त्याला कंपनीच्या नावाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: खडकवासला ते फुरसुंगी बोगदा प्रकल्पाचा अहवाल जलसंपदा विभागाकडे; प्रकल्पामुळे वाचलेले पाणी ग्रामीण भागासाठी

बंगळुरुत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर पुण्यातील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये जगताप याच्यासह तरुणांना बोलाविण्यात आले होते. त्यांचा समाजमाध्यमावर समूह तयार करण्यात आला होता. चौकशीत पवारने जगताप याच्यासह आणखी काही जणांकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आले.

हेही वाचा >>>China Covid Outbreak : गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मुखपट्टी!; करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याची केंद्राची राज्यांना सूचना

दरम्यान, जगतापने सीरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चौकशी केली. तेव्हा मंगेश पवार नावाची व्यक्ती कंपनीत अधिकारी नसल्याचे उघडकीस आले. चौकशीत पवार यांनी २८ तरुणांकडून ४१ लाख १५ हजार रुपये घेतल्याचे उघडकीस आले असून सहायक पोलीस निरीक्षक विनय झिंजुर्के तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 lakh fraud of youth with the lure of getting a job in a serum company pune print news rbk 25 amy
First published on: 22-12-2022 at 12:20 IST