राज्यातील तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या ‘गणित’ विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे शनिवारी उघड झाले असताना नजिकच्या काळात होणाऱ्या परीक्षेच्या आणखी पाच विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा सध्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. याबाबत तंत्रशिक्षण विभागाच्या औरंगाबाद कार्यालयामध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत. तंत्रशिक्षण पदविकेच्या द्वितीय सत्राची गणिताची (अॅप्लॅईड मॅथेमॅटिक्स) आणि प्रथम सत्राच्या गणित ‘बेसिक मॅथेमॅटिक्स’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकांची परीक्षेपूर्वीच विक्री झाली होती. या परीक्षा मंडळाने पुढे ढकलल्या आहेत. मात्र, पेपरफुटीचे हे सत्र अजूनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अॅप्लाईड सायन्स, अॅप्लाईड मेकॅनिक्स, फ्लुईड मेकॅनिक्स, प्रिंट ऑफ मटेरिअल, फंडामेंटल इलेक्ट्रॉनिक्स या विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा सध्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. या प्रश्नपत्रिकांचीही गेले अनेक दिवस विक्री सुरू असल्याचे बोलले जात आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर तंत्रशिक्षण विभागाकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
दरम्यान, गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी औरंगाबाद विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे.
या सत्र परीक्षेत यापूर्वी झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रमेंट्स अँड मेजरमेंट या विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या असल्याची चर्चाही विद्यार्थ्यांमध्ये आहे. यापूर्वी २००२ साली मंडळाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे मंडळाला परीक्षा पुन्हा घ्यावी लागली होती. यावर्षीही सगळ्याच प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत का, याबाबत मंडळाने चौकशी करावी अशी मागणी होत आह
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या परीक्षेची माहिती देणाऱ्या ६६६.ल्ली६२ल्लीं१.३‘ या संकेतस्थळाचीही चर्चा विद्यार्थ्यांमध्ये आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून गणिताच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे तंत्रशिक्षण मंडळाच्या निदर्शनास आले होते, असे समजते.