पिंपरी : संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित तीन दिवसीय ५८ व्या निरंकारी संत समागमाला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होणार आहे. रविवारी (२६ जानेवारी) ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ या विषयावर आध्यात्मिक विचारधारेचे दिव्य रूप सजणार आहे.

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या ३०० एकर मैदानावर हाेणाऱ्या या समागमाला देश-परदेशातील लाखो भक्त सहभागी हाेणार असल्याची माहिती संत निरंकारी मिशनच्या अध्यक्षा राजकुमारी यांनी दिली. समागम कमिटीचे अध्यक्ष शंभूनाथ तिवारी, महाराष्ट्र प्रचार-प्रसार समन्वयक दर्शन सिंह, मोहन छाब्रा, राकेश मुटरेजा, झाेनलप्रमुख ताराचंद करमचंदानी, प्रिमल सिंह या वेळी उपस्थित होते.

dr abhay bang health services news in marathi
“देशातील ११ कोटी जनतेला वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाहीत”, डॉ. अभय बंग यांची खंत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
PMC News: महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी जाणार इंदूरला हे आहे कारण !
pimpri chinchwad municipal corporation news
पिंपरी : शहराची लोकसंख्या ३० लाख आणि पहिल्या लोकशाही दिनात केवळ दोन तक्रारी
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही

आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, उपाहारगृह, वाहनतळ, स्वच्छता आणि इतर मूलभूत सेवा सांभाळण्यासाठी संत निरंकारी सेवादलाचे १५ हजार सदस्य समर्पित भावनेने सेवा देत आहेत. मुख्य सत्संग कार्यक्रम दररोज दुपारी दोन वाजता सुरू होईल. ज्यामध्ये अनेक वक्ते, गीतकार, कवी हे सद्गुरू आणि ईश्वराप्रति भावना व्यक्त करतील. माता सुदीक्षाजी महाराज यांचे रात्री आठ वाजता मार्गदर्शन होईल. एक आध्यात्मिक कवी दरबार संत निरंकारी समागमचे विशेष आकर्षण ठरेल. कार्यस्थळावर सात प्रवेशद्वार असणार आहेत. जिल्हानिहाय निवासी शंभर तंबू, चार तात्पुरते रुग्णालये, १२ रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.

मणक्याची तपासणी व उपचार

या सोहळ्यात मणक्याच्या आजारावर विशेष उपचारांची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी अमेरिकेहून ५० डॉक्टरांचा चमू तैनात केला जाणार आहे. सोहळास्थळावर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रकाशन विभागाकडून ठिकठिकाणी स्टॉल लावले आहेत. संत निरंकारी मिशनचे सचित्र दर्शन घडविण्यासाठी आकर्षक निरंकारी प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे.

२५० जोडप्यांचा विवाह सोहळा या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी २५० जोडप्यांचा विवाह करण्यात येणार आहे. या सोहळ्याला सुदीक्षाजी महाराज उपस्थित राहणार आहेत. या विवाहसोहळ्याची संपूर्ण जबाबदारी निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात येणार आहे. ५० हजार आसनक्षमता असलेला मुख्य सत्संग हॉल बनविण्यात आला आहे.

Story img Loader