बंडगार्डन पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी

अमेरिकेतील अंतराळ संशोधन ‘नासा’च्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक तपासात आरोपीने सहा कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.‘राइस पुलर’ यंत्राच्या विक्रीतून चांगला परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा >>>पुणे: अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न

goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

या प्रकरणी राम गायकवाड (रा. अकलूज, जि. सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाबासाहेब नरहरी सोनवणे (वय ५०, रा. शिवपार्वती सोसायटी, सातववाडीजवळ, गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राईस पूलर या यंत्राला मागणी असून या यंत्राच्या खरेदीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष आरोपींनी दाखविले होते. पुणे स्टेशन परिसरातील एका हाॅटेलमध्ये आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’तील प्रतिनिधी भारतात येणार आहेत. ‘नासा’चे शास्त्रज्ञ या यंत्राचे परीक्षण करणार असून राइस पूलर यंत्रावर ते संशोधन करणार आहेत. राइस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी असल्याचे आरोपींनी गुंतवणूकदारांना सांगितले होते. बनावट कागदपत्रांद्वारे आरोपींनी नागरिकांकडून पैसे गोळा केले, असे साेनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा >>>पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १५ रस्त्यांचे सर्वेक्षण; पोलीस, महापालिका, मेट्रो, पीएमपीएल अधिकाऱ्यांची समिती स्थापन

पोलिसांकडे १०० तक्रार अर्ज
या प्रकरणात फसवणूक झालेल्या १०० नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले होते. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतपर्यंत पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले असून सहायक पोलीस निरीक्षक रुइकर तपास करत आहेत.