scorecardresearch

संतापजनक  : वडीलांना जेवणाचा डबा देऊन परतणाऱ्या ७ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण ; पुणे स्टेशन परिसरातील घटना

या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संतापजनक  : वडीलांना जेवणाचा डबा देऊन परतणाऱ्या ७ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण ; पुणे स्टेशन परिसरातील घटना
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : पुण्यातील पुणे स्टेशन परिसरातील ७ वर्षीय मुलगी वडीलांना जेवणाचा डब्बा देऊन येत असताना.एका व्यक्तीने अपहरण करुन लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,७ वर्षीय मुलींच्या वडीलांचा पुणे स्टेशन परिसरात चहा विक्रीचा स्टॉल आहे.

ती सोमवारी दुपारच्या सुमारास वडीलांना डब्बा देऊन घरी येत होती.त्यावेळी तिला एका व्यक्तीने रेल्वेच्या फ्लाट क्रमांक ६ च्या जवळ असलेल्या एका खोलीत घेऊन गेल्यावर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे त्या मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.त्यावर आरोपींन जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे ती मुलगी घाबरली आणि लघुशंकेसाठी जायचे असल्याचे सांगितले.तेथून तिने आरोपीची नजर चुकवून पळ काढल्यावर घडलेली.सर्व हकिकत मुलीने आईला सांगितली. त्यावर मुलीच्या आईने आमच्या तक्रार देताच, अनोळखी आरोपीच्या विरोधात पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे.या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे न्यूज ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 7 year old girl abducted and molested in pune station area by unknown person zws 70 svk88

ताज्या बातम्या