पुण्यातील मोमीनपुरा येथील झोहरा कॉम्प्लेक्समध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नशरा रेहमान खान असं मृत्युमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजीमा रेहमान खान यांनी नशराला मोमीनपुरा येथील झोहरा कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या आजीकडे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सोडले होते. त्यानंतर नशरा ही दिवसभर घरीच खेळत होती. मात्र पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास नशरा ही बाहेर खाऊ आणण्यासाठी आजीकडून पैसे घेऊन लिफ्टमध्ये गेली. यावेळी आजीला अचानक ओरडण्याचा आवाज यायला लागला. त्यामुळे आजीने धावत लिफ्टजवळ जाताच, नशरा लिफ्टमद्ये अडकल्याचं दिसून आलं.

यानंतर स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करुन नशराची सुटका केली. यानंतर नशराला जवळच्या रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून सध्या नशराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची चौकशी करण्यात येते आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 year old girl lost her life after she stuck in society lift
First published on: 20-10-2018 at 22:56 IST