पिंपरी महापालिकेच्या वतीने २५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या ७३ सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सदनिका देण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका मुख्यालयात याबाबतची सोडत काढण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात यातील लाभार्थ्यांना आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आदी उपस्थित होते.
सफाई कर्मचारी स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवतात. त्यांचे विशिष्ठ स्वरुपाचे काम तसेच त्यांचा सामाजिक, आर्थिक दर्जा विचारात घेऊन राज्यशासनाने त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना सदिनका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पिंपरी पालिकेतील ज्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्ष किंवा त्याहून अधिक झाली आहे. असे कर्मचारी तसेच सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, मयत कर्मचारी अथवा त्यांचे पात्र वारसदार यांना २६९ चौरसफुट चटई क्षेत्राची मोफत सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 73 sanitation workers of pimpri municipality will get flats pune print news amy
First published on: 15-08-2022 at 16:44 IST