पुणे : गुंतवणुकीवर चांगल्या प्रकारचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका इंटिरियर डिझाईन व्यवसायिक तरुणाची तब्बल ८१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

ज्ञानेश्वर लक्ष्मण घाडगे (रा. वागळे इस्टेट ,पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील राजेंद्र धायरकर (वय ३७) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही घटना एप्रिल २०२२ पासून ते आतापर्यंत घडलेली आहे.

हेही वाचा – पुणे : गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर घाडगे यांनी तक्रारदार स्वप्नील धायरकर याचा विश्वास संपादन करून आरोपीच्या इन्कम रूट इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडले. सुरुवातीला पैसे गुंतवणूक केल्यानंतर त्याचे परताव्याचे पैसे वेळेत दिले गेल्याने तक्रारदार यांचा विश्वास बसला. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने गुंतवणुकीच्या दरमहा टीडीएस वजा करून नऊ टक्के मोबदला देणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. त्यानुसार वेळोवेळी गुंतवणुकीसाठी एकूण ८१ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यावरील मोबदला तसेच गुंतवणुकीची रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा – एमबीए, एमएमएस सीईटी आता ६ मे रोजी; पुनर्परीक्षेसाठी १३ हजार २७१ विद्यार्थ्यांची नोंदणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती समर्थ पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. त्रंबके याबाबत पुढील तपास करत आहेत.