धावत्या पीएमपी बसमध्ये प्रवासी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात विमानतळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नवल बाळकृष्ण पाटील (वय ४८, रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- पुणे : मांढरदेव यात्रेसाठी एसटीच्या जादा गाड्या
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तक्रारदार महिला पुणे मनपा ते तळेगाव ढमढेरे या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दी होती. आरोपी पाटील याने धावत्या बसमध्ये महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केला. आरोपी पाटील बसमधून उतरुन पसार झाला.