scorecardresearch

अमित शहा, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भारतीय जनता पक्षाचे माहिती-तंत्रज्ञान सेलचे विनीत वाजपेयी (वय ३९) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमित शहा, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमित शहा, एकनाथ शिंदे

समाजमाध्यमावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- पुणे : चांदणी चौकातील वाहतूक ११ तासांनी पूर्ववत

याबाबत भारतीय जनता पक्षाचे माहिती-तंत्रज्ञान सेलचे विनीत वाजपेयी (वय ३९) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याबद्दल रामदास शिर्के नावाच्या एका प्रोफाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिर्केने हिंदु एकता या समाजमाध्यमावरील समूहावर गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वाजपेयी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या