पिंपरी: नेरे – दत्तवाडी येथे एका अ‍ॅनिमल शेल्टरमध्ये सांभाळण्यास दिलेल्या श्वानाचा सांभाळ न करता त्याला डांबून ठेवून ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अ‍ॅनिमल वेलफेअर ट्रस्टचे रोहित चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने  रोहित यांना १२ हजार रुपये देऊन त्यांच्याकडील मादी श्वान सांभाळण्यासाठी दिले होते. त्यानंतर फिर्यादीने रोहितला श्वानाचे छायाचित्र पाठविण्यास सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, छायाचित्र पाठवण्यास रोहितने टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी श्वानाचे परिचय पत्रक लावून श्वानाचा शोध घेतला. त्यावेळी रोहितच्या शेल्टरजवळ एका व्यक्तीने शेल्टरपासून २०० मीटर अंतरावर मृत श्वान दाखविले. सांभाळण्यास दिलेल्या श्वानाचा सांभाळ न करता तिला डांबून ठेवून ठार मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फौजदार झोल तपास करीत आहेत. दरम्यान, यामुळे श्वान प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.