पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात एका महिलेची भोंदूबाबाने सोन्याचा हंडा मिळवून देण्याचे आमिष दाखवत,तब्बल अडीच लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तर याबाबत कोणाला काही सांगितल्यास,तुला मंत्राद्वारे बकरी बनवलं,अशी धमकी भोंदू बाबाने महिलेला दिल्याची घटना घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी खानबाबा उर्फ मदारी महमद खान (रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिलेची तिच्या मैत्रिणीच्या माध्यमांतून काही महिन्यापूर्वी भोंदूबाबा मदारीची ओळख झाली.घरची आर्थिक परिस्थिती दुर व्हावी,यासाठी उपाय सांगा,असे पीडित महिलेने मदारी ला सांगितले.आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला सोन्याचा हंडा मिळवून देतो,पण त्यासाठी पूजाअर्चा करावी लागेल,त्यासाठी खूप खर्च येईल असे पीडित महिलेला सांगितले.
त्यानुसार भोंदू बाबाने पंधरा दिवसांपूर्वी त्याने तिला पुजा मांडून मातीचे मडके आणि त्यावर काळ्या रंगाचे कापड बांधून तिला ते मडके दिले.मडकयावरील काळा कपडा 17 दिवसांनी रात्री 11 वाजून 21 मिनिटांनी उघडण्यास सांगितले. त्यानंतर पीडित महिलेने मदारीने सांगितल्यानुसार 17 दिवसांनी फोन करून मडक्याचे काळे कापड काढले.त्या मडक्यात हात घालून पाहिल्यानंतर मडक्यात माती आढळून आली.त्यानंतर तिने त्याला फोन करून सांगितले की,सोन्याचा हंडा नाही.तुम्ही माझी फसवणूक केल्याचे सांगितले.तुमची मी तक्रार करेल असे सांगताच भोंदू बाबा म्हणाला तू जर कोणाला काही सांगितले.तर तुला बकरी बनवलं,अशी धमकी दिली.
तर या पीडित महिलेची आरोपी खानबाबा उर्फ मदारी महमद खान याने पीडित महिलेकडून वेळोवेळी पैसे घेऊन तब्बल 2 लाख 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे.तर या प्रकरणी आरोपी आरोपी महंमद खानसाहेब जान मदारी अटक करण्यात आली असून आरोपींला न्यायालयाने हजर केले असता 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.