पिंपरी- चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी विशाल माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी विशाल माने यांची साप्ताहिक सुट्टी होती, ते मित्रांसमवेत बाहेर फिरण्यासाठी गेले होते. रात्री घरी आल्यानंतर त्यांनी आई- वडिलांसह गप्पाही मारल्या, त्यानंतर त्यांनी बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतला. आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने आजूबाजूच्या व्यक्तींना बोलवून दरवाजा तोडला तेव्हा विशाल हे लटकलेल्या अवस्थेत आढळले.

हेही वाचा… बहिणीच्या शोधात त्याने गाठले नेपाळहून पुणे; पोलिसांच्या मदतीने अशी झाली भेट

हेही वाचा… पिंपरी: बालचमूंची पावले सायन्स पार्क, तारांगणाकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशाल माने यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि मुलं आहेत. त्यांची पत्नी नुकतीच माहेरी गेली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल माने हे भोसरी एमआयडीसी या पोलीस ठाण्यात कार्यरत होते. विशाल माने यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यांच्या जाण्यामुळे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर शोककळा पसरली आहे.