लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: येरवडा कारागृहात पक्षाघाताचा झटका आलेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ६०, रा. उरखेडकर मळा, ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. खेडेकर याच्या विरोधात २०२१ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खेडेकर तसेच साथीदारांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. त्याला १० सप्टेंबर रोजी कारागृहात पक्षाघाताचा झटका आला होता.

कारागृह प्रशासनाने त्याला ससून रुग्णालयात दाखल केले होते. ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात बुधवारी (१३ सप्टेंबर) पहाटे साडेतीन वाजता खेडेकर याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारागृह प्रशासनाला दिली, अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी दिली.

हेही वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानाचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे (वय ३२) याने रविवारी (१० सप्टेंबर) येरवडा कारागृहातील बराकीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली हाेती.