पुणे : बदलती जीवनशैली आणि त्यामुळे होणारे आजार याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामधे गुडघ्यातील सांध्यामधील अतिघर्षण, बसण्या उठण्याच्या चुकीच्या पद्धती, बदलती जीवनशैली, लठ्ठपणा अशा अनेक कारणांमुळे गुडघेदुखी होऊ शकते. आतापर्यंत दुखण्याचे प्रमाण वाढले की गुडघा बदलणे हा एकमेव पर्याय होता. आता जिथे आधी पूर्ण गुडघा बदलण्याऐवजी घर्षण झालेला तेवढाच भाग बदलण्याची उपचार पद्धती स्वीडनमध्ये सुरू झाली आहे. भारतात ही उपचारपद्धती आता उपलब्ध झालेली आहे.

एपिसर्फ मेडिकलने गुडघ्याच्या सर्व व्याधींवर कोबाल्ट-क्रोम मिश्र धातूपासून तयार केलेले एपिसिलर इम्प्लांट्स आणि एपिगाईड सर्जिकल ड्रील गाईड हे सांध्यातील कुर्च्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी विकसित केले आहे. स्वीडनमधील ही उपचार पद्धती आता भारतात सुरू करण्यात येत असल्याचे स्टॉकहोममधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटचे माजी प्राध्यापक आणि एपिसर्फ मेडिकलचे संस्थापक प्रा. लीफ रीड यांनी सांगितले.

हेही वाचा – कात्रज तलावात तरुणीची उडी मारून आत्महत्या, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

हेही वाचा – विदर्भात अवकाळीसह गारपिटीचा अंदाज.. कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

फोकल ऑस्टिओकॉन्ड्रल दोष आणि ऑस्टियोआर्थरायटिसवर एपिसर्फ मेडिकलने विकसित केलेल्या उपचार प्रणालीची माहिती डॉ. रीड यांनी दिली. यावेळी एपिसर्फचे विपणन संचालक फ्रेडरिक झेटरबर्ग, एपीसर्फ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मोहन नायर आणि पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्याम ठक्कर उपस्थित होते. एपिसिलर पटेलोफेमोरल इम्प्लांटमुळे हाडातील दोष बदलण्यासोबतच हाडांचे संरक्षण होते. तसेच, सांध्याचे कार्य सुधारते, रुग्णास कमी वेदना होऊन रुग्णाची जीवनशैली सुधारते, असेही डॉ. रीड यांनी सांगितले.