पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे खासगी शाळेच्या बसचा दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसला हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना पुण्यातील घोडेगाव परिसरात घडली आहे. या बसमध्ये एकूण ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ४४ पैकी चार विद्यार्थ्यांना मंचर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळघोडे येथील शाळेची बस ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना घेऊन गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती. तेव्हा, एका वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट दरीत कोसळली . सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील मुले ही किरकोळ जखमी झाली आहेत . त्यांना उपचारासाठी घोडेगाव आणि मंचर येथील शासकीय रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : दुधाला एफआरपी देण्याची मागणी; संघर्ष समितीकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

या घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा अपघातस्थळी दाखल झाल्या होत्या. या अपघातातनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून पालकांनी घाबरून जाऊ नये अस आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A school bus carrying students fell into a valley in ambegaon 4 students injured pune accident ayush prasad kjp
First published on: 27-09-2022 at 17:26 IST