scorecardresearch

पुणे : कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका ‘आप’ लढणार

राज्यातील आगामी छावणी परिषदेच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड)  निवडणुका लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे.  

aam aadmi party cantonment board elections in maharashtra
आम आदमी पक्ष

राज्यातील आगामी छावणी परिषदेच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड)  निवडणुका लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे.  

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली राज्याच्या विकासाच्या मॉडेलची संपूर्ण जगभर चर्चा होत आहे.  दिल्लीच्या धर्तीवर राज्यातील जनतेला विनामूल्य शिक्षण, आरोग्य, पाणी आणि स्वस्त वीज इत्यादी सुविधा तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हवे आहे.

हेही वाचा >>> एनएचएआयमुळे रस्ते महामंडळाची तीन हजार कोटींची बचत

राज्यातील विविध महानगर पालिका क्षेत्रातील बऱ्याच शहरात छावणी परिषदेच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरीस होणार आहेत. छावणी परिषदेच्या माध्यमातून छावणी परिसरातील अनेक विकासकामे करण्याची संधी असते तसेच छावणी परिषद सदस्य एक प्रकारे नगरसेवकच असतो, त्यामुळे आम आदमी पक्ष या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरणार आहे, अशी घोषणा राज्य संयोजक  रंगा राचुरे यांनी केली.

छावणी परिषदेच्या  निवडणुका असलेल्या मतदार संघांतील पक्ष कार्यकर्त्यांनी, इच्छुकांनी  शहर प्रभारी अथवा कार्याध्यक्ष यांच्याशी  संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक तसेच पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आप पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका लढवणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 10:53 IST
ताज्या बातम्या