scorecardresearch

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना मुद्रित माध्यमांचे वावडे ; कॅमेरे नसल्याने पत्रकार परिषद रद्द

आम आदमी पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून संजय सिंह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना मुद्रित माध्यमांचे वावडे ; कॅमेरे नसल्याने पत्रकार परिषद रद्द
(संग्रहित छायाचित्र) संजय सिंह

पुणे : आम आदमी पक्षाचे खासदार, राष्ट्रीय प्रवक्ता संजय सिंह यांनी शुक्रवारी त्यांची नियोजित पत्रकार परिषद वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी नसल्याने रद्द केली. त्यामुळे सिंह यांना मुद्रित माध्यमांचे वावडे असल्याचे स्पष्ट झाले. सिंह यांच्या या कृतीमुळे मुद्रित माध्मयांचे पत्रकार आणि आम आदमी पक्षाचे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. मात्र सिंह जाहीर सभेत बोलतील, तुम्ही तेथेच या, अशी सारवासारव पदाधिकाऱ्यांनी केली.

आम आदमी पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून संजय सिंह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जाहीर सभेपूर्वी आपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांची पत्रकार परिषद होईल, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार मुद्रित माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी नियोजित वेळेत उपस्थित राहिले. सिंह यांची पत्रकार परिषद वेळेत सुरू होऊ शकली नाही. आपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पावणेपाच वाजता वृत्तवाहिन्यांचे पत्रकार नसल्याने पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पत्रकार परिषदेची घोषणा करणे आणि ती अकल्पीत कारणास्तव रद्द करण्यात आल्यानंतर आप पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही दिलगिरी व्यक्त करण्यात आली नाही. त्याबाबतचा ठोस खुलासाही त्यांना करता आला नाही. संजय सिंह यांच्या सत्कारासाठी आणलेले हारतुरे घेऊन पदाधिकारी जाहीर सभेसाठी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रवाना झाले. सिंह जाहीर सभेत बोलतील. पत्रकारांनी तेथेच यावे, असे सांगत आप पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aap mp sanjay singh canceled press conference due to no news channels representatives pune print news zws

ताज्या बातम्या