लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात एप्रिलमध्ये टँकरची मागणी झालेली नव्हती. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू करण्याची गरज भासली नाही. मात्र, सध्या चार तालुक्यांतील २४ गावांत सुमारे ४० हजार नागरिकांना २० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच जिल्ह्यातील दुष्काळी गावांकडून टँकरची मागणी होत असते. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून खासगी आणि शासकीय टँकरने संबंधित गाव, वाडी, वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. तसेच यंदा अवकाळी पावसामुळे तीव्र पाणी टंचाई भासली नाही, असे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… ‘डीआरडीओ’चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

आंबेगाव तालुक्यातील आठ गावांतील १३ हजार २७९ ग्रामस्थांना आठ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. भोर तालुक्यातील एका गावातील सुमारे २६१ ग्रामस्थांना एका टँकरने पाणी देण्यात येत आहे. जुन्नरमधील आठ गावांतील १४ हजार ९२७ ग्रामस्थांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे. खेडमधील सात गावांत ११ हजार १४० ग्रामस्थांना पाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, असेही विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About 40 thousand citizens are being supplied with water by 20 tankers in pune print news psg 17 dvr
First published on: 09-05-2023 at 11:58 IST