पुण्याच्या दापोडीत दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीची हत्या करून आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. या प्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शंकर नारायण काटे (वय- ६०) आणि संगीता काटे (वय- ५५) अशी हत्या झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. तर प्रमोद मगरुडकर (वय- ४७) असे आरोपीचे नाव असून त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. अद्याप या दुहेरी हत्याकांडाचे कारण समजू शकेलेले नाही. 

प्राप्त माहितीनुसार दापोडीत बेसावध असलेल्या दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून त्यांची हत्या करण्यात आली. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा, आरोपी प्रमोदने त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. अद्याप दुहेरी हत्येमागील कारण समजू शकलेले नाही. ही घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे आरोपी प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्याने फिरत होता. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आला होता. २०१७ ला माझ्या आईचा मृत्यू झालेल्या व्यक्तीने बलात्कार केला आणि त्याच्या पत्नीने त्यास मदत केली असे तो बडबडत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. मात्र हा पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने वर्तवली आहे.