पुणे : त्रिदल आणि पुण्यभूषण फाऊंडेशन यांच्यातर्फे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात डॉ. मोहन आगाशे यांची टोपी काढून घेऊन अनुपम खेर यांनी स्वतः घातली.

हेही वाचा >>> नियतीने मला बदला घेण्याची संधी दिली… ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची टिप्पणी

shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

डॉ. मोहन आगाशे आणि त्यांची टोपी हे अनोखे समीकरण आहे. प्रत्येक कार्यक्रमात डॉ. आगाशे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण टोपी परिधान करतात. त्यानुसार पुण्यभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमातही डॉ. आगाशे टोपी घालूनच आले होते. पुण्यभूषण पुरस्कारात पुणेरी पगडीचाही समावेश असल्याने सन्मान प्रदान करताना डॉ. आगाशे यांच्या डोक्यावरची टोपी काढून खेर यांनी स्वत: घातली आणि डॉ. आगाशे यांना पुरस्काराची पुणेरी पगडी परिधान केली. डॉ. आगाशे यांची टोपी घालून ‘आज पूनासे मैं ये टोपी लेकर जानेवाला हूँ’, अशी टिप्पणी करताच हास्यकल्लोळ झाला.