पुणे : देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या प्रवेशांसाठी केंद्रीय विद्यालय संघटनेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बालवाटिका (पूर्वप्राथमिक) ते दहावीपर्यंतच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल आहे.

केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत राबवली जाते. त्यानुसार केंद्रीय विद्यालयांतील बाल वाटिका १, बाल वाटिका २ आणि बाल वाटिका-३ या वर्गांसह इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. तर दुसरी ते दहावीच्या वर्गांसाठी जागा रिक्त असल्यास प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा – बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?

हेही वाचा – पुणे: आयटी हब हिंजवडीत फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा

बाल वाटिका १ मध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्याचे वय तीन वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्षांपेक्षा जास्त नसावे, बाल वाटिका २ मध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्याचे वय चार वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्षांपेक्षा जास्त नसावे, बाल वाटिका तीनमध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्याचे वय पाच वर्षांपेक्षा कमी आणि सहा वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्याचे वय सहा वर्षांपेक्षा कमी आणि आठ वर्षांपेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहिती https://kvsangathan.nic.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.