पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र शुक्रवारपासून (२७ जानेवारी) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी संबंधित प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची असून, प्रवेशपत्रासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून, स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. प्रवेशपत्रात विषय, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे.

हेही वाचा – पुणे : अपघाताच्या बनावाने मोटारचालकाला लुटले, डेक्कन काॅलेज रस्त्यावरील घटना

हेही वाचा – ‘आयसर पुणे’तील डॉ. दीपक धर यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा नमूद करावा. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admit cards for 12th exam maharashtra available from 27th january pune print news ccp 14 ssb
First published on: 25-01-2023 at 23:16 IST