पिंपरी चिंचवड शहरात ‘नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्ट (एनएमटी)’ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी पालिका व आयटीडीपी संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये ‘नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्ट’ या विषयाशी संबंधित जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच, सुरक्षित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त् तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

हेही वाचा : पिंपरी : पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या या करारप्रसंगी स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य वित्त अधिकारी सुनील भोसले संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. आयटीडीपी ही संस्था जगभरातील शहरांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते. त्यांच्याशी पालिकेने केलेल्या कराराअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रदूषणाची पातळी घटण्यास मदत मिळणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.