पुणे : राज्यातील हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर झालेला परिणाम, कमी उत्पादकता, बाजारपेठेतील अनिश्चितता आणि तंत्रज्ञानाचा संथ गतीने वापरामुळे समस्यांचा सामाना करावा लागत असल्याची स्पष्टोक्ती कृषी बदल घडवून आणेल. उत्पन्न वाढ, दर्जा, टिकाउपणा यांची सांगड घालून शेतीत परिवर्तन घडवतील. प्रयोगशाळेतील प्रत्येक संशोधन, नवतंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शेतात रुजले पाहिजे, तरच त्या संशोधनाला खरा अर्थ प्राप्त होईल. आज आपण राज्यातील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देत बदलत्या काळाची गरज ओळखून आणि कृषी तंत्रज्ञानात ‘शेतकरी केंद्रबिंदू’ मानून संशोधन होणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी राज्यातील कृषी विद्यापीठांना दिला.

राज्य शासन आणि कृषी विभागाकडून ‘महाराष्ट्रातील कृषी संशोधन परिसंस्थेची पुनर्रचना: निष्पत्तीकडून प्रभावाकडे’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन बुधवारी भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, केंद्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. मांगीलाल जाट, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल, उपसचिव प्रतिभा पाटील, श्रीकांत आंडगे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. किशोर शिंदे, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, भारतीय अनुसंधान परिषद संस्थांचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ‘राज्यातील कृषी विद्यापीठांनी पुस्तकी ज्ञान न ठेवता आपल्या संशोधनातून असे निष्कर्ष द्यावेत, जे थेट शेतकऱ्याच्या उत्पादनक्षमतेत कृषी संशोधन व्यवस्था प्रयोगशाळेत नव्हे, तर शेतात आणि बाजारपेठेत परिणाम घडवणाऱ्या युगात प्रवेश करत आहे. संशोधनाचं मोजमाप शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या समाधानाच्या हास्यात दिसले, तरच शेतकरी सधन होईल.’

‘राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, आणि उद्योगांसाठी उपयुक्त आणि मापन योग्य प्रभाव देणारे, गरजेनुसार उपाय म्हणून तंत्रज्ञान विकसित करावे. या प्रशिक्षण शिबिरातून तज्ज्ञ मंडळी नवे आयाम ओळखून प्रयोगशील शिक्षणाची नवी दिशा ठरवतील,’ असा विश्वासही भरणे यांनी व्यक्त केला.

संशोधन प्रयोगशाळांपुरतेच मर्यादित

संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल असून हीच मोजमापाची कसोटी आहे. आजपर्यंतचे कृषी संशोधन हे पुस्तकांपुरते आणि प्रयोगशाळांपुरते मर्यादित राहिले, पण कालमापानुसार शेतकऱ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचवणे, अडचणींवर मात करणारे उपाय शोधणे आणि प्रत्येक प्रयोगाची शेतात चाचणी घेणे आवश्यक आहे.