राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या खाद्यांवर घेतल्याचे दिसते. कारण, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाच्या या दोन स्टार प्रचारकांपैकी मोदींच्या ९ तर शाहांच्या १८ सभा राज्यात होणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह हरयाणातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ ९ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यांपैकी १७ ऑक्टोबर रोजी सातारा आणि पुण्यात मोदींची सभा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी ही सभांचे नियोजन सुरू आहे. पुण्यातील सभेच्या जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तसेच अमित शाह यांच्या सभांच्या तारखा आणि ठिकाणही अद्याप निश्चित झाले नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.