चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी चा उमेदवार देण्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील ठाम आहेत. अशी माहिती पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी लोकसत्ता.कॉम ला दिली आहे. गुरुवारी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसंदर्भात पुण्यात बारामती हॉस्टेल येथे बैठक पार पडली. बैठकी अगोदर इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार यांनी मुलाखती घेतल्या. महाविकास आघाडी म्हणून देखील निवडणूक लढवण्याची तयारी अजित पवार यांनी दर्शवली आहे. 

हेही वाचा >>> “रिकामटेकड्या लोकांना…”, महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, लहान बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणले आहेत. परंतु, भाजपाकडून एबी फॉर्म कोणाला मिळणार हा महत्वाचा प्रश्न आहे. तर, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि काँग्रेस ने निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. गुरुवारी पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूकी संदर्भात राष्ट्रवादीची बैठक पार पडली.

हेही वाचा >>> “…तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखू शकतो” सुषमा अंधारेंचं पुण्यात सूचक विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे इच्छुक दहा उमेदवार अजित पवार यांना वैक्तिक भेटले. त्यांच्याशी अजित पवार यांनी चर्चा केली. मग, सर्व पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत राष्ट्रवादी चिंचवड पोटनिवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच, कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा तसा आग्रह देखील आहे. महाविकास आघाडी जो निर्णय होईल त्याबाबत नरमाई ची भूमिका अजित पवार यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकी संदर्भात महाविकास आघाडी बाबत राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा होणार आहे. २०१९ च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठबळावर निवडणूक लढलेले शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांचा मार्ग मात्र सुकर होणार नसल्याचे सध्या तरी चित्र आहे.